ग्रामीण भागातील मुलींना आत्मनिर्भर करणारे माध्यम, शेकडो जणींना मिळाला रोजगार
महिलांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागतो.
घरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसेल तर महिलांना स्वत:चा पायावर उभा राहावे लागते.
महिलांसाठी शिवणकाम व्यवसाय फायद्याचा ठरतो.
अनेक महिला शिवणकामातून आत्मनिर्भर झाल्याचे उदाहरणे आहेत.
नगर जिल्ह्यातील मनीषा शिंदे यांनी आपला शिवणकाम व्यवसाय उभारला असून त्या इतरांना देखील प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
मनीषा यांचे शिक्षण बी ए झालं असून त्यांनी फॅशन डिझाईनचे सर्व कोर्स केले आहेत.
ग्रामीण भागात महिलांसाठी क्लास घेणाऱ्या मनीषा विजय शिंदे यांनी मुलींना शिवणकाम शिकवले.