चंदनाच्या शेतीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
परिस्थिती कितीही खडतर असली तरी इच्छा शक्तीच्या जोरावर आपण गगन भरारी घेऊ शकतो.
हे जालना जिल्ह्यातील तरुणानं दाखवून दिलंय.
जेमेतेम सातवीपर्यंत शिक्षण, परिस्थिती इतकी साधारण की घरी दोन वेळा जेवणाची देखील भ्रांत.
पण या तरुणानं जिद्दीनं सारं आयुष्य बदलून टाकलंय.
हा तरुण आता थेट कोट्यधीश झाला आहे.
गंगाधर कुबरे असं या तरुणाचं नाव आहे.
जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी या गावातील प्रगतीशील शेतकरी आहे.
त्याने एक एकर शेती 300 चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे.
300 चंदनाच्या झाडांची किंमत आता तीन कोटींच्या घरात आहे.