स्पर्धा परीक्षेत यशासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री मानली जाते.
बीड जिल्ह्यातील सीमा शेख हिनं एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे.
मादळमोही येथील सीमा शेख वनअधिकारी झाली आहे.
MPSC वनसंरक्षक परीक्षेत सीमा मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे.
सीमा हिचे वडील डॉक्टर असून आई गृहिणी आहे.
सीमा यांना स्पर्धा परीक्षा करण्याची प्रेरणा मामांकडून मिळाली.
सीमा यांचे प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शालेत झाले.
BSc पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
महाराषट्रात अव्वल येत वनअधिकारी झालेल्या सीमा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.