सीमा नाही मीना? पावला-पावलावर खोटं बोलली

चहाच्या टपरीपासून विमानाच्या व्हिसापर्यंत, कोकणपासून काश्मीरपर्यंत सध्या तुफान चर्चेत आहे ती सचिनची सीमा.

उत्तर प्रदेश एटीएसने केली सीमा गुलाम हैदरची चौकशी. मात्र दिली नाही क्लीन चिट.

पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात येताना ती पावला-पावलावर बोलली खोटं?

सीमा आणि सचिनने काठमांडूच्या न्यू विनायक हॉटेलमध्ये नोंदवलं होतं खोटं नाव, दिला होता खोटा पत्ता.

ती 12 मे रोजी भारतात आली. ज्या बसमधून आली तिच्या मॅनेजरलाही खोटी माहिती दिली. तिने तिचं नाव 'मीना' सांगितलं, असं सृष्टी बस सर्व्हिसचे मॅनेजर प्रसन्ना गौतम म्हणाले.

तिने 4 सीट बुक केल्या. ओळखपत्र विचारल्यावर 'आहे' म्हणाली. तिच्यासोबत 4 मुलं होती. पोखराहून सकाळी 7 वाजता बस निघाली.

'तिने 12 हजार रुपये दिले, उर्वरित 6 हजार रुपये तिच्या सोबतीच्या मदतीने दिल्लीत दिले', असं प्रसन्ना गौतम म्हणाले.

न्यूज 18 इंडियाच्या हाती आली सीमा हैदरची हॉट्सअ‍ॅप चॅट. तिने गुगल पेमेंटसाठी बस सेवेतील व्यक्तीला पाठवला 'मीना' नावाच्या व्यक्तीचा नंबर. लिहिलं, 'भाई, कृपया तिला एक मेसेज पाठवा.'

सूत्रांच्या माहितीनुसार, सीमाने सचिनचा नंबर सेव्ह केला होता 'मीना जी'. त्यानेच भरले होते तिच्या तिकिटाचे उर्वरित पैसे.