थंड पाण्याचा माठ कसा बनतो माहितीये?

सोलापूर जिल्ह्यातील होटगी गावामध्ये 100 पेक्षा जास्त कुंभार आजही पारंपरिक पद्धतीनं माठ निर्मिती करतात.

माठ निर्मिती करणारे कारागीर लक्ष्मण कुंभार यांनी माठ कसा बनवतात याची माहिती दिली आहे. 

कर्नाटकातील नदी किनाऱ्यावर साचलेली माती आणि साखर कारखाण्यातील बग्यास एकत्र केला जातो.

या एकत्रित मातीला चाकावर आकार देऊन त्याचा माठ तयार केला जातो. 

त्यानंतर दगडाचा घोटा आणि लाकूड यांच्या आतून बाहेरून बडवण्याच्या विशेष पद्धतीनुसार मोजून मापून माठ तयार केला जातो.

 हा संपूर्ण मानवी कौशल्याचा प्रकार आहे. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. 

एक व्यक्ती दिवसाला 20 माठ तयार करु शकतो

तीन ते चार दिवस एका बंदिस्त खोलीमध्ये हवा किंवा पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवले जाते. 

त्यानंतर भट्टीमध्ये तापवून तो अधिक ठणक केला जातो.

या सर्व निर्मिती प्रक्रियेतून तावून सुलाखून निघाल्यानंतर डेरा किंवा माठ तयार होतो, असं कुंभार यांनी सांगितलं.

यापूर्वी अगदी कमी किंमतीला मिळणारा माठ आता 120 ते 150 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.