वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पवनारची वेगळी ओळख आहे.
गावातून जाणाऱ्या धाम नदी काठावर नंदीखेडा हा प्रसिद्ध परिसर आहे.
नंदीखेडा परिसरातच भगवान शिवशंकर आणि नंदीचं प्राचीन मंदिर आहे.
अंदाजे सतराशे ते अठराशे वर्षांपासून पवनार येथे हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं.
नंदीखेडा येथील मंदिरात असणाऱ्या नंदीबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात.
या नंदीखाली मोठ्या प्रमाणात धन असल्याचं पूर्वापार सांगितलं जातंय.
हे धन मिळवण्यासाठी बैलांच्या 12 जोड्या लावून प्रयत्न केले पण अपयश आल्याचं सांगितलं जातं.
नंदीला उठविण्याचा प्रयत्न झाला आणि तेव्हा नंदी हंबरल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.
या नंदीमुळेच मंदिर परिसराला नंदीखेडा नाव पडल्याचं स्थानिक पुजारी सांगतात.
निसर्गरम्य नंदीखेडा परिसरात भाविक आणि पर्यटक येत असतात.
गांधींच्या काळापासून 'वेस्ट' ते बेस्ट!
रंगावरून ब्लड लिली म्हणून ओळखली जाणारी ही फुलं 6 ते 7 दिवस राहतात.
Click Here