सातवी पास महिला का बनली टॅक्सी चालक?
मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर सारिका रणदिवे या महिलेचा प्रवास मोठा रंजक आहे.
मुंबईत चालणाऱ्या टॅक्सी या क्षेत्रावर नियमित पुरुष मक्तेदारी राहिलेली आहे.
आजही मुंबईच्या काही विविध रंगाची टॅक्सी चालते त्यात 99 टक्के पुरुष ड्रायव्हर आहेत.
मात्र, या कामाला छेद देण्याचं काम मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या सारिका रणदिवे यांनी केले आहे.
पुरुषी मक्तेदारी असलेल्या टॅक्सी ड्रायव्हिंगच्या क्षेत्रात मोठ्या जिद्दीने सारिका रणदिवे या गेल्या वर्षभरापासून मुंबईत टॅक्सी चालवत आहेत.
सारिका रणदिवे या मानखुर्द परिसरात राहतात. सारिका या सातवी पास आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती ही हलाखीची होती.
झाडू काम, काही घरांमध्ये घरकाम करण्याची कामे सारिका गेल्या अनेक वर्षांपासून करत होत्या. घरी पती तीन मुलं असून त्यांचे पती ही ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतात.
मात्र पती-पत्नी दोघेही नोकरी करत असूनही घरातला गाडा हाकणे कठीण झाले होते.
त्यामुळे वेगळं काही करून चार पैसे पदरात पडता येतील का ? याची चाचणी सारिका यांनी सुरू केली होती.
त्याच वेळी मुंबईत कुठेच महिला टॅक्सी ड्रायव्हर दिसत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी उतरावे ड्रायव्हिंग शिकावी असा सारिकाला पोपट धाते यांनी सल्ला त्यांनी दिला.
2019 साली सारिका यांनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल मध्ये जाऊन ड्रायव्हिंग शिकण्याचे धडे घेतले आणि मुंबईत सारिका टॅक्सी चालवू लागल्या.
टॅक्सी चालवल्यामुळे घराच्या आर्थिक परिस्थिती सुधारायला मोठी मदत झाली असल्याचे आता सारिका रणदिवे सांगतात.