बैलगाडी अपघातानं घडवला लेखक!

अवघ्या विशीत असताना बैलगाडी घेऊन शेतात निघालेल्या सांगलीतील तरुणाचं आयुष्य पालटले. 

बैल उधळला आणि चाऱ्याने भरलेली बैलगाडी उलटून कर्नाळचा सचिन वसंत पाटील गाडीखाली सापडला.

बैलगाडी दोन्ही पायांवरून गेल्याने सचिनचे दोन्ही पाय निकामी झाले. 

अपघातानंतर डॉक्टरांनी फारतर दोन वर्षे जगाल असं सचिनला सांगितलं.

मात्र सचिनच्या जिद्द आणि आत्मविश्वासानं सर्व संकटावर मात केली.

कायमचं अपंगत्व आल्यानं सचिनला हालचालीसाठी दुसऱ्यांच्या आधाराची गरज होती. 

वडिलांनी लावलेल्या वाचनाच्या गोडीला सचिननं जगण्याचा आधार बनवलं. 

अंथुरणाला खिळलेल्या अवस्थेत सचिननं वाचन आणि लेखन सुरू केलं. 

गावगाड्यातील लिखाण अनेकांवा आवडू लागलं आणि गावकथाकार म्हणून तो प्रसिद्ध झाला. 

सचिनचे 'सांगावा', 'अवकाळी विळखा' हे कथा संग्रह लिहिले आणि ते प्रकाशित झाले. 

सचिनची 'कष्टाची भाकरी' ही कथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलीय.