पूर्वी विवाह, वरात आणि मिरवणुका बॅण्ड वाजल्याशिवाय झाल्यासारख्याच वाटायच्या नाहीत.
बॅण्ड म्हणजे शान, श्रीमंती आणि रुबाब दाखवायचं साधन होतं.
काळ बदलला आणि डॉल्बीच्या दणदणाटानं बॅण्ड संपूर्णपणे संपल्यात जमा झाला.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनने बँडचा उरला सुरला आवाज संपवला.
एका बॅण्डच्या जीवावर जगणारे 20-22 संसार रस्त्यावर आले.
सांगलीच्या बॅण्डची कधीकाळी राज्य आणि परराज्यात चर्चा होती.
एका बॅण्डला 20-25 लाखाचं भांडवल लागतं पण आता सुपाऱ्या मिळत नाहीत.
बॅण्डसाठी काढलेलं कर्ज फेडायचं कसं हाच मोठा प्रश्न सध्या बॅण्ड मालकांपुढे आहे.
व्यवसाय परवडत नसल्याने नवी पिढी बॅण्ड व्यवसायत यायला तयार नाही.
बॅण्डमधील वादकांना वीटभट्टी किंवा रोजगार हमीच्या योजनांवर काम करण्याची वेळ आलीय.
Click Here