आनंद महिंद्रांना भुरळ घालणारा इडली किंग!

दक्षिण भारतातील पदार्थ असणाऱ्या इडलीनं महाराष्ट्रातील लोकांनाही भुरळ घातलीय. 

राज्यातील प्रत्येक शहराप्रमाणे सांगलीतही एक प्रसिद्ध इडलीवाला आहे. 

30 वर्षांपूर्वी मंगलोर जिल्ह्यातील बैतंगडी येथून शेट्टी हे कामासाठी सांगलीत आले.

हॉटेलमध्ये काम करताना जोडधंदा म्हणून इडल्या बनवून विकण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला दिवसाला 20-25 इडली विकल्या जात होत्या. 

पुढे इडलीची मागणी वाढत गेली आणि शक्ती केटरर्स नावानं व्यवसाय सुरू केला.

सध्या शेट्टींच्या इडली फॅक्ट्रीत दिवसाला 35 ते 40 हजार इडली तयार होतात.

दररोज 3 क्विंटल तांदूळ आणि एक क्विंटल उडीद डाळ इडली तयार करण्यासाठी लागतो. 

सांगलीसह परिसरातील हॉटेल आणि घरगुती कार्यक्रमांसाठी येथून इडलीचा पुरवठा होतो. 

इडली किंग तिमाप्पा शेट्टी यांच्या इडलींची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रांनी घेतलीय. 

केरळचा शिवभक्त हमरास!

Click Here