सांगलीच्या निहालनं केलं आईचं स्वप्न खरं!
आपल्या मुलानं मोठेपणी काय व्हावं याचं स्वप्न कित्येक आई-वडिलांनी पाहिलेलं असतं.
काही जणांच्या बाबतीमध्येच ते खरं होते.
सांगलीच्या निहाल कोरे या तरुणानं त्याचं आईचं स्वप्न खरं केलंय.
निहाल नुकत्याच लागलेल्या युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाय.
निहाल तिसरीमध्ये असताना त्याच्या आईनं पाहिलेलं स्वप्न त्यानं पूर्ण केलंय.
निहालचं युपीएसएसी परीक्षेतील यश हे एखाद्या संघर्षमय कथेसारखं आहे.
लहानपणापासून हुशार असलेल्या निहालचा तिसरीमध्ये आयएएस अधिकारी रिचा बागला यांनी सत्कार केला होता.
त्या कार्यक्रमानंतर मुलानंही सरकारी अधिकारी व्हावं असं स्वप्न त्याच्या आईनं पाहिलं. आईचं हे स्वप्न निहालनं पूर्ण केलंय.
निहालचा लक्ष्यपूर्तीपर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो यूपीएससीची तयारी करत होता.
या तयारीच्या दरम्यान त्यानं अर्थशास्त्रमधील पदवी पूर्ण केली. त्याचं लग्न झालं. लग्नानंतरही तो घरीच बसून यूपीएससीची तयारी करत होता.
त्याला तब्बल 7 वेळा अपयश आलं. अगदी थोड्या मार्क्सनी त्याची संधी हुकली.त्यानंतरही निराश न होता त्यानं अखेर हे यश खेचून आणलंय.
यावर्षी लागलेल्या युपीएससीच्या निकालात तो 922 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झालाय.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here