गावात दीड तास टीव्ही, मोबाईल बंद!

ऑनलाइनच्या जमान्यात विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्हीचे लागलेले वेड हे घातक ठरू शकते. 

मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. 

सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव गावाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 

कोरोना काळात मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि मुलांची शिक्षणाची गोडी कमी होऊ लागली. 

सरपंच विजय मोहिते यांनी 14 ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली.

दररोज संध्याकाळी दीड तास मोबाईल आणि टीव्ही बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.

मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय. 

अभ्यासाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला असून रोज सायंकाळी तो वाजतो.

आता गावातील विद्यार्थी नियमित अभ्यास करत असून इतरांनाही वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम सुर असून  मोबाईलमुळे हिरावलेला कुटुंबातील संवादही पुन्हा सुरू झाला आहे.

विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!

Click Here