उन्हानं शरीराची लाहीलाही होत असातना हिरवळीनं नटलेला परिसर सर्वांनाच आवडतो.
पण सांगली जिल्ह्यातील जत सारख्या दुष्काळी भागात हिरवळ शोधूनही सापडत नाही.
जत तालुक्यातील कुलाळवाडी हे कायम दुष्काळी गाव असून येथील पर्जन्यमान अत्यंत कमी आहे.
मात्र, जिल्हा परिषद शाळेतील बालचमुंच्या ग्रीन आर्मीनं एका गावाचं रुपडंच पालटून टाकलंय.
कुलाळवाडीतील विद्यार्थ्यांनी गावात 4 हजारांहून अधिक झाडे लावली असून ती जगवलीत.
कुलाळवाडीतील जिल्हा परिषद शाळा माझी भाकरी उपक्रमामुळं प्रकाश झोतात आली.
शाळेनं पाच वर्षांपासून राजमाता अहिल्यादेवी वनराई वृक्ष संवर्धन उपक्रम राबविला आहे.
विद्यार्थी दर वर्षी सुमारे एक लाखाहून अधिक बियांचे संकलन करून रोप तयार करतात.
आता संपूर्ण गावानंच वृक्ष संगोपन कार्यात वाहून घेतलं असून झाडांना ठिबक सिंचन केलं आहे.
कुलाळवाडीतील वृक्ष संवर्धन उपक्रमास परदेशातूनही मदतीचा हात मिळत आहे.
Click Here