उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी देशी जुगाड!

राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट असून सांगलीत तापमानाचा 40 अंशापर्यंत गेलं आहे. 

माणसांना उकाड्याने असह्य होत असताना मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. 

वाढत्या उष्णतेमुळं मिरज तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांवर संकट कोसळलंय. 

पोल्ट्रीमधील कोंबड्यांना अतिउष्णतेने त्रास होत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

कुक्कुटपालन व्यावसायिक विविध पद्धतीनं शेडमधील तापमान कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेडमध्ये फॅन, फॉगर, शेडवर उसाचे पाचट, स्प्रिंकलर आदी उपाययोजना केल्या जात आहेत.

विष्णू थोरवे यांनी आपल्या कुक्कुटपालन शेडमध्ये देशी जुगाड केलंय. 

थोरवे यांनी कुक्कुटपालन शेडवर उसाचा पाला टाकला असून त्यावर स्प्रिंकलर बसवलंय. 

उसाचा पाला ओला राहिल्याने शेडमधील तापमान कमी करण्यास मदत होत आहे.

विशेष म्हणजे या जुगाडाला खर्च कमी असून त्याचा फायदा होत आहे. 

आनंद महिंद्रांना भुरळ घालणारा इडली किंग!

Click Here