खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये!

भारतात शेती हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. 

कवडीमोल दरानं माल विकल्यानं कधीकधी घातलेले पैसेही निघत नाहीत. 

सध्या सांगली जिल्ह्यातील काही भागात टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणात आहे. 

मात्र, टोमॅटोला दर नसल्यानं तोडणीही परवडत नाही. 

मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतात टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे. 

शेतकरी सारंग माळी यांनी सहा एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केली आहे. 

सहा एकर टोमॅटो लागवड करण्यासाठी एकूण चार लाख चाळीस हजार खर्च झाला.

पहिल्या तोड्यात 2 टन माल निघाला मात्र हातात दोन रुपयेही शिल्लक राहिले नाहीत.

आता माळी यांनी टोमॅटोचा सहा एकराचा प्लॉट तोडणी न करताच सोडला आहे. 

शेतकऱ्यांसाठी योग्य सरकारी धोरण नसल्याने नुकसान होत असल्याची खंत माळी यांनी व्यक्त केली. 

केरळचा शिवभक्त हमरास!

Click Here