उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणांना गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची अपेक्षा असते.
सध्या नोकरी मिळणेच कठीण झालं असून परिस्थितीला दोष न देता काहीजण पर्याय शोधत आहेत.
पारंपरिक शेतीकडे वळत अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले असून ते यशस्वीही झालेत.
अशीच काहीशी कहाणी सांगली जिल्ह्यातील बेडगच्या उच्च शिक्षित मयूर पाटील याची आहे.
मयूरनं पशुवैद्यकीयचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेना म्हणून पारंपरिक शेतीचा पर्याय निवडला.
शेतीला पुरक व्यवसाय म्हणून त्यानं पशुपालन करण्याचं ठरवलं आणि गाई घेतल्या.
कुटुंबीयांच्या मदतीनं पशुपालन सुरू केल्यावर अद्ययावत गाईंचा गोठा बांधला.
हळूहळू गाई, म्हशींची संख्या वाढत गेली असून सध्या त्याच्याकडे लहानमोठी 40 जनावरे आहेत.
रोज हजारभर लिटर दुधातून मयूरल महिना अखेर दीड लाखांचं उत्पन्न मिळत आहे.
शिक्षणानंतर नोकरी नाही म्हणून निराश होणाऱ्यांना मयूर पाटीलचा प्रवास प्रेरणादायी आहे.
विद्यार्थ्यांनी वाचवली वनराई!
Click Here