आख्खं गावच आहे 'तेंडल्या'चं फॅन!

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. 

जगभरातील चाहते सचिनचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करत आहेत. 

सांगली जिल्ह्यातील एका गावानं 24 एप्रिल हा दिवस मराठी नववर्षाप्रमाणे साजरा केला आहे.

शिराळा ताालुक्यातील औंढी येथे संपूर्ण गावानंच दारात गुढ्या उभ्या केल्या आहेत.

सचिनचा छोटा पुतळा तयार करून त्याची गावातून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. 

गावातील महिलांचे लेझीम पथक, हलगी, तुतारी यांच्या निनादात गावातून दिंडी निघाली.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले हे ही या गावच्या वाढदिवस समारंभात सहभागी झाले.

सचिनचा वाढदिवस जागतिक क्रिकेट दिन म्हणून साजरा केला जाईल, असं लेले यावेळी म्हणाले.

सचिनला वडापाव आवडतो म्हणून पालखी सोहळ्याच्या शेवटी 100 वडापावचा नैवद्य दाखवण्यात आला. 

सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित तेंडल्या चित्रपटाचे शूटिंग औंढी येथेच पार पडले आहे. 

औंढीत गुढ्या, पताका, दिंडी, जल्लोष, घरात गोडधोड जेवण असा मोठा उत्साह आहे. 

सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!

Click Here