'इथे' महादेवांच्या आधी रावणाला पूजतात
उदयपूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आवरगडच्या डोंगरात वसलंय महादेवांचं प्राचीन मंदिर.
'कमलनाथ महादेव' अशी मंदिराची ओळख.
मंदिरात महादेवांसह रावणाचीही पूजा होते, हे विशेष.
रावणाला न पूजता महादेवांची केलेली पूजा पूर्णतः व्यर्थ मानली जाते.
मंदिरात एका बाजूला आहे रावणाची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूला आहे शिवलिंग.
राक्षस रावणही महादेवांची पूजा करायचा, अशी आहे मान्यता.
रावण एकावेळी महादेवांना कमळाची 108 फुलं अर्पण करायचा.
एकदा एक फूल कमी पडलं, म्हणून रावणाने आपलं एक शीर छाटून महादेवांना अर्पण केलं.
तेव्हा महादेव रावणाला प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या बेंबीत अमृत कुंड स्थापन करून त्याला दहा मुखांचं वरदान दिलं, अशी आख्यायिका आहे.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.