'शाकाहाऱ्यांचं मटण'
झारखंडच्या बाजारात विविध प्रकारच्या दुर्मिळ भाज्या आढळतात.
त्यापैकी रुगडा भाजीची खाद्यप्रेमी वर्षभर वाट पाहतात. ही भाजी वर्षातून केवळ 2 महिने पावसाळ्यात मिळते.
या भाजीसाठी खिसा अक्षरशः रिकामा करावा लागतो. 600 ते 1000 रुपयांदरम्यान तिची किंमत असते.
रांचीच्या सभोवताली असलेल्या जंगलांमध्ये साल वृक्षांच्या मुळांतून ही वनस्पती उगवते.
या भाजीला रुगडा, पुट्टू, खुखडी अशी वेगवेगळी नावं आहेत.
शाकाहाऱ्यांसह मांसाहारप्रेमीदेखील ही भाजी अतिशय आवडीने खातात.
काळी आणि पांढरी, रुगडा अशा दोन प्रकारची असते. पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच बाजारात तिला मोठी मागणी मिळते.
चवीला स्वादिष्ट आणि भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व, खनिजं अशी रुगडाची ओळख आहे.
पौष्टिक गुणधर्मांमुळे रुगडा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.