रमजानमध्ये मोहम्मद अली रोडला जायलाच हवं!
रमजानचा महिना आला की मुंबईकरांना मोहम्मद अली रोडची आठवण होते.
रमजानमध्ये संध्याकाळी मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांची रेलचेल असते.
यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्यानं प्रत्येक स्टॉलवर मोठी गर्दी होत आहे.
संपूर्ण मुंबईसह जवळच्या शहरातील खवय्ये देखील रमजानमध्ये मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात.
मध्य रेल्वेवरील सॅन्डहर्स्ट रोड पासून अगदी चालत तुम्ही 10-15 मिनिटात मोहम्मद अली रोडवर येऊ शकता.
रमजानमध्ये गेल्या 70 वर्षापेक्षा जास्त काळापासून मोहम्मद अली रोडवर विविध पदार्थांची दुकानं थाटली जातात.
मुंबईत फक्त रमजान महिन्यात मिळणारा सांधल हा पदार्थ खाण्यासाठी इथं मोठी गर्दी असते.
वेगवेगळ्या मिठाईंची लज्जत मुंबईकरांना अनुभवता येते.
रमजान महिन्याच्या निमित्तानं सुकामेव्याची मोठी विक्री या ठिकाणी होते.
रमजान महिन्यातील संध्याकाळ संस्मरणीय करण्यासाठी मुंबईकरांनी इथं नक्की भेट द्यायला हवी.