रामटेक अन् श्रीरामाचा वनवास कनेक्शन!

आणखी पाहा...!

विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. 

रामटेकचे पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.

श्री रामाने वनवासात असताना येथे वास्तव्य केल्याचा लोकमानस आहे. 

रामटेक येथील गड मंदिर यादवकालीन आहे. 

मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. 

रामटेकचा उल्लेख सिंदूरगिरी, तपोगिरी, शैवालगिरी असाही करतात. 

नागपूरकर थोरले रघुजी भोसले यांनी मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार केला. 

रामटेकजवळ नंदिवर्धन येथे वाकाटक काळातील नगरधन किल्ला आहे. 

रामटेक येथे रामनवमी, टिपूर पौर्णिमा या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होते. 

महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातूनही भाविक रामटेकला येतात.