सहलीचं प्लॅनिंग करताय? इथं द्या भेट
सध्या सर्वत्र पावसाला सुरूवात झालीय.
पावसामुळे वातावरणात बदल झाला असून सर्वजण मूड फ्रेश करण्यासाठी सहलीचं प्लॅनिंग करत आहेत.
पुण्याजवळ एक दिवसाच्या सहलीसाठी अनेक ठिकाणं आहेत.
यापैकी एका खास ठिकाणाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रामदारा हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांचं याच ठिकाणी काही काळ वास्तव्य होतं, म्हणून या भागाला रामदरा हे नाव पडलं, अशी कथा सांगितली जाते.
एका तळ्याच्या मधोमध रामदऱ्याचं मंदिर आहे. भाविकांना मंदिरात जाता यावं, यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे.
महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्या आणि दुकानांनी गराडा घातलेला असतो, तसा या मंदिराभोवती नाही.
त्यक्ष मंदिर आणि तलावाच्या परिसर झाडं तसंच लता-पल्लवांनी सुशोभित झाला आहे.
अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!
Click Here