पुण्यातील बुधवार पेठेचं भयाण वास्तव

वेश्येचं घर म्हणजे समाजानं खांद्यावर घेतलेली तिरडी असून तिचं दफन होत नाही तोपर्यंत चर्चा होणारच, असं ज्येष्ठ लेखक सआदत हसन मंटो म्हणाले होते. 

प्रत्येक शहरातल्या भागात असलेल्या वेश्या वस्तीमधील स्त्रियांचे काही कॉमन प्रश्न आहेत. 

पुण्यातील बुधवार पेठ हा भाग रेड लाईट एरिया म्हणून बदनाम असून विविध राज्यातून महिला या ठिकाणी येतात. 

जिवंतपणी प्रचंड वेदना सहन केल्यांनतर मृत्यूनंतर वेश्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायाला कोणीही पुढं येत नाही. 

पुण्यातील एक महिला मात्र याला अपवाद ठरली असून अलका गुजनाल या गेल्या 12 वर्षांपासून हे काम करत आहेत

बुधवार पेठेत राहणाऱ्या अलका गुजनाल यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे हाल जवळून पाहिले आहेत. 

H1 N1 सारखा गंभीर आजर होऊन त्यांचं निधन झालं, तरी त्यांचा अंत्यविधी करणसाठी कोणीही उपस्थित नसतं. 

या महिलांच्या मृत्यूनंतर जवळंचं कुणीच नसल्यानं बेवारस महिलांचा अंत्यविधी करण्याचं काम अलका करतात. 

मृत महिला ज्या धर्माची आहे, त्याप्रमाणे त्यांचं अंत्यविधी करत असल्याचं अलका यांनी सांगितलं.

गेल्या 12 वर्षांपासून काम करत असताना 40 पेक्षा जास्त महिलांचे अंत्यसंस्कार केल्याचं अलका सांगतात.

समाजानं दृष्टिकोन बदलण्याची गरज असून या महिलांना योग्य स्थान मिळावं, असं मत अलका यांनी व्यक्त केलं.

नवरा अन् बायको दोघे करतात कतरिना कैफची पूजा, पण का?

Click Here