सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप ही काळाची गरज झाली आहे.
ऑफिसच्या कामापासून ते शाळा कॉलेजच्या प्रोजक्टपर्यंत प्रत्येक कामासाठी लॅपटॉपची गरज पडतेच.
अजूनही अनेकजण कमी बजेटमुळे चांगल्या कॉन्फिगरेशनसह लॅपटॉप खरेदी करू शकत नाहीत.
आर्थिक अडचणीमुळे चांगला लॅपटॉप खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी खास बातमी आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवडेमध्ये आपल्याला कमी किमतीत चांगल्या कॉन्फिगरेशनसह लॅपटॉप मिळतील.
पिंपरीतील शगुन चौक येथे जुने लॅपटॉप स्वस्तात मिळतात.
तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुम्ही या ठिकाणाहून लॅपटॉप खरेदी करू शकता.
ऑफिस, बिझनेस किंवा ऑनलाईन स्टडीसाठी लॅपटॉपचा शोध इथं पूर्ण होऊ शकतो.
सेकंड लॅपटॉपवर डिस्काउंट सोबत आकर्षक बँक ऑफर्स देखील मिळत आहेत.
लॅपटॉप वर्किंग कंडीशनमध्ये मिळत असून यावर सेलर द्वारे 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे.
पावसाळ्यासाठी इथं करा स्वस्त चप्पल खरेदी!
Click Here