जमिनीखाली खोदून बांधण्यात आली ही लेणी!
पुण्याला जसा सांस्कृतिक वारसा आहे तसाच ऐतिहासिक वारसाही आहे. पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक वाडे, वास्तुकला, किल्ले आहेत.
त्यापैकीच शिवाजीनगर परिसरात पाताळेश्वर ही जमिनी खालील लेणी पाहिला मिळते. या लेणीला पाहिला या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात.
या लेणीचा काय आहे इतिहास? ही लेणी कोणी बांधली याबद्दलच इतिहास संशोधक संजय सोनवणे यांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष याने त्याच्या काळात इ.स.च्या 8 व्या शतकाच्या सुमारास पाताळेश्वर लेणी खोदून बांधली.
राष्ट्र कुटांच्या काळात पुणे हे पुनवडी म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.
पाताळेश्वर हे लेणी जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते.
त्या एकाच परंपरेतील ही लेणी आहे. पाताळेश्वर लेणीला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे.
या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड आणि वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे.
त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत.
मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे, असं इतिहास संशोधक संजय सोनवणे सांगतात.