हैदराबादी डोसा चक्क पुण्यात!

दक्षिण भारतीय ब्रेकफास्ट हा संपूर्ण राज्यातील लोकप्रिय आहे. 

इडली, डोसा, उतप्पा यासारखे पदार्थ घरोघरी तयार केले जातात. 

त्याचबरोबर या पदार्थांचे स्पेशल हॉटेल आणि स्टॉलही फेमस आहेत.

पुणेशहरातल्या वेगवेगळ्या भागातही हे पदार्थ मिळतात. 

तुम्ही नेहमीचा डोसा खावून कंटाळला असाल तर एका खास हैदराबादी डोस्याची ओळख आम्ही करून देणार आहोत.

पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या साई डोसा सेंटरमध्ये हैदराबादी डोसा मिळतो. 

नेहमीच्या डोस्याचा रंग पांढरा असतो. पण हा पिवळ्या रंगाचा आहे. 

त्यामध्ये बटाटा किंवा इतर भाजी नाही तर उपमा टाकून दिला जातो. 

ज्ञानेश्वर देवकाते या नांदेड जिल्ह्यातल्या तरुणाकडं हा स्पेशल डोसा मिळतो.