पुण्यात आढळला अतीदुर्मिळ साप!
पुण्याजवळच्या पिंपरी चिंचवडमधील एका सोसायटीत अतीदुर्मिळ जीवांच्या गटात मोडणारा मांजऱ्या साप आढळला.
या प्रकारचा साप अनेक पुणेकरांनी पहिल्यादांच पाहिला. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
वन्यजीव रक्षकांनी हा साप वेळीच तााब्यात घेतला. पण हा साप नेमका आहे तरी कसा याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
मांजऱ्या सापाला Common Cat Snake असे देखील म्हटलं जातं.
फिकट राखाडी तसेच काहीसे पिवळे रंग असणाऱ्या या मांजऱ्याच्या शरीरावर गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते.
डोक्यावर तपकीरी किंवा काळे लहान लहान ठिपके, डोळ्याच्या मागून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष, पोट पांढरे त्यावर छोटे छोटे काळे ठिपके, मानेपेक्षा डोके मोठे, मोठे डोळे, लांबट शेपूट असते.
मांजऱ्याचा अधिवास शक्यतो बांबूचे बेट, घनदाट जंगले आणि दाट झाडी असणाऱ्या ठिकाणी असतो.
या सापाला डिवचलं तर शरीराचे वेटोळे करुन हल्ला करतो. त्याचबरोबर शेपटीचे टोक उंच उभे करुन जोरजोरात हलवतो.
या सापाचे विषारी दात जबड्यातील मागे असतात. हा साप निमविषारी आहे.
साप आढळून आल्यास घाबरून न जाता आपल्या जवळच्या सर्पमित्राना संपर्क साधावा,' असे आवाहन सर्पमित्र राजू कदम यांनी केला.
दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!
Click Here