चक्क सायकलला जोडली वॉशिंग मशिन!
सध्याच्या काळात मुलं सातवी-आठवीला गेली की त्यांच्या हातात दुचाकी पडते. त्यामुळे सायकलिंगचा आनंद कमी होतोय.
अनेक तरुण-तरुणी सायकल हौसेनं घेतात. पण, काही दिवसांनी ती धुळखात पडलेली असते.
व्यायाम आणि सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे.
पुण्यातल्या एका तरुणानं याच गोष्टींचा विचार करून सायकलवर चालणारी चक्क वॉशिंग मशिन तयार केलीय.
पुण्याचे प्राध्यापक मंदार पाटील यांनी ही खास सायकल तयार केलीय.
ही सायकल चालवतानाच तुमचे कपडे धुवून निणार आहेत.
सायकलीचे पेडल जसं मारू तसे त्याला जोडलेल्या वॉशिंग मशिनमध्ये एकावर एक आपटले जातात आणि चांगले धुतले जातात.
एका वेळी सात किलोपर्यंतचे कपडे धुणे शक्य आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.