बच्चे कंपनीसाठी खुलं झालं इस्रोचं जग!

प्रत्येक लहान मुलांमध्ये एक संशोधक दडलेला असतो. त्यांना जगाबद्दल कुतुहूल असतं.

हे कुतुहल शमवण्यासाठी ते निरनिराळे प्रश्न विचारतात. मुलांना अनेकदा पुस्तकं दिली तरी त्यांचं समाधान होत नाही. 

त्यांची ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी पुण्यात इस्रोकडून खास म्युझियम सुरू करण्यात आलंय.

जगातील प्रमुख अंतराळ संस्था असलेल्या इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोच्या वतीनं हे म्युझिअम सुरू करण्यात आलंय. 

'इंडिक इन्सिपेरशन' असं या म्युझिअमचं नाव आहे. या माध्यमातून मुलांना इस्रोचं जग खुलं झालं आहे.

या म्युझियममध्ये इस्रोमध्ये वापरण्यात येणारे रॉकेट्स तसंच वेगवेगळ्या उपकरणांचे डेमो विकत घेता येतील.

त्याचबरोबर इस्रोच्या रोमहर्षक इतिहासाची माहिती देखील मुलांना या म्युझियममधून मिळणार आहे.