भरतकामाचा विचार केला तर चिकनकारी निःसंशयपणे या यादीत अव्वल ठरतात.
या सुंदर तंत्राचा उगम लखनऊमधून झाला आणि इथे अनेक सुंदर चिकनकारी साड्या बनवल्या जातात.
लग्नसमारंभ किंवा एखाद्या कार्यक्रमात खूप जणांना जड आणि भरलेल्या साड्या घालायला नकोसं होतं.
त्यामुळे अनेक जणांची एलिगंट लूकसाठी चिकनकारी साडीला पसंती असते.
पुण्यात चिकनकारी साड्यांचं खास मार्केट असून इथं 2 हजार रुपयांपासून साड्या मिळतात.
फर्ग्युसन कॉलेज रोडवर लखनौ चिकन पॅलेस हे चिकनकारी साड्यांचं दुकान आहे.
लखनौ चिकन पॅलेस अस्सल चिकनकारी साड्यांचं कलेक्शन असून इथं चिकनकारीचे खून ऑप्शन आहेत.
चिकन पॅलेसमध्ये 2 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये किमतीच्या साड्या मिळतात.
तुम्ही चिकनकारी साड्या त्यांच्या धाग्याने आणि नाजूक फॅब्रिकद्वारे सहजपणे ओळखू शकता.
चिकनकारी हा पारंपारिक शैलीतील भरतकामाचा एक प्रकार असून तो सौंदर्यासाठी ओळखला जातो.
पुण्यातील सेकंड लॅपटॉपचं मार्केट!
Click Here