चिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा पारंपरिक प्रकार महिलांना भुरळ घालत असतो.
भारतातील लखनऊमध्ये हे कापड तयार केले जाते म्हणून त्याला लखनवी असं म्हणतात.
सध्या तरुणींमध्ये चिकनकारी कुर्तीजचे फॅड दिसत असून ती अतिशय लाईटवेट आणि ग्रेसफुल असतात.
एलिगंड आणि अट्रॅक्टिव्ह ट्रेंडी लूकसाठी पुण्यात चिकनकारी कुर्तीजचं खास कलेक्शन आहे.
पुणे शहरातील गजबजलेल्या म्हणजेच फॅशन स्ट्रीट (एफसी रोड) या ठिकाणी 300 रुपयांपासून कुर्ती मिळतात.
अल्वीरा क्रिएशन या दुकानात अतिशय सुंदर आणि वजनाने हलक्या रोजच्या वापरासाठीही कुर्ती आहेत.
या ठिकाणी 300 पासून ते 1800 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज मिळतील, असं दुकानदार सांगतात.
दिसायलाही अतिशय स्टायलिश असणाऱ्या या कुर्ती स्पेशल ओकेजनसाठी देखील ट्राय करू शकता.
या चिकनकारी कुर्तीवर अतिशय आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा मिळत आहे.
स्पेशल ऑकेजनसाठी आकर्षक ज्वेलरी, दुपट्टा आणि इतर ऍक्सेसरिज सोबत या कुर्ती पेअर करता येतात.
माऊलींच्या पालखीसोबत आयटी दिंडी!
Click Here