केशर आंबा लावगडीसाठी खास टिप्स

भारतीय फळ बाजारात आंब्याची मागणी मोठी असून आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. 

भारतात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वाधिक आंब्याची उलाढाल होत असते. 

भारतामध्ये विविध प्रजातींची लागवड होत असली तरी महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड ही केशर आंब्याची होते. 

आमराई लावताना काय काळजी घ्यावी, याबाबतच बीडमधील कृषी तज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी माहिती दिली आहे. 

केशर आंब्याची लागवड ही 12 ×6, 15 × 6 अंतरावर किंवा चौरस स्वरुपात 12×12 वर दक्षिण उत्तर करावी.

लागवड अंतर ठरवताना त्याची छाटणी व्यवस्थापनावर देखील लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. 

जूनमध्ये आंब्याची लागवड करताना झाडांना दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाश मिळेल अशी योजना करावी. 

लागवडीसाठी एक ते दीड फुटाचे चर काढून त्यात सेंद्रिय खत, लिंबोळी, कीटकनाशक भरून घ्यावे.

आंबा लागवडीसाठी चिकणमातीची जमीन योग्य असली तरी सर्व प्रकारच्या जमिनीत केशर आंबा येतो. 

15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान आंबा कधीही लावू नये. तसेच पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 

कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

Click Here