भावाचा सल्ला ठरला टर्निंग पॉईंट, सामान्य गृहिणीनं बदलली हजारो आयुष्य 

मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या प्रीती सावंत या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतात. 

सर्व सामान्य गृहिणी असलेल्या प्रीती सावंत या आधी घरकाम करत होत्या. 

मात्र त्यात पुरेसा पगार मिळत नव्हता. त्यातच काही कारणास्तव एका ठिकाणी घरकाम करत असताना अचानक त्यांना कामावरून काढण्यात आलं. 

अश्यावेळी हातात दुसर काम नसताना कामावरून काढल्यामुळे प्रीती विचारात होत्या.

अचानक कामावरून काढून टाकल्याने दुसऱ्याच्या घरी जाऊन एक घरकाम करणारी स्त्री दुसरं काय काम करू शकते असा विचार त्या स्वतःबद्दल करत होत्या. 

मात्र, त्यांच्या भावाने जिम ट्रेनर होण्याचा सल्ला दिला आणि प्रीती तयारीला लागल्या. 

जिम ट्रेनर झाल्यावर 5 हजार रुपये सुरुवातीचे मानधन नंतर त्यांनी काही कोर्स केले आणि आता त्या घर व्यवस्थित चालू शकतात इतकं मानधन त्यांना मिळतं.

आपण मागची दोन वर्ष कोरोनामुळे घरीच अडकलो होतो. 

 परिस्थिती सामान्य झाल्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

त्यामुळे आता फिटनेस ट्रेनर्सची लोकांना गरज वाटू लागली आहे. 

मी मागची बारा वर्ष या क्षेत्रात काम करते आणि हजारहून अधिक लोकांना मी आतापर्यंत ट्रेनिंग दिले आहे.

यात काही सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे, असं प्रीती सावंत यांनी सांगितलं.