थरथरत्या हातांनी 'तो' काढतो जबरदस्त फोटो

अक्षय परांजपे या मुंबईकर प्रोफेशनल फोटोग्राफरचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.

अक्षयला 'विल्सन डिसीज' हा आजार आहे. या आजारामुळे त्याचं सतत शरीर थरथरत असतं.

फोटोग्राफी करण्यासाठी शरीर आणि मन स्थिर हवं. हालचालींवर आणि मनावर नियंत्रण असेल तरच उत्तम फोटोग्राफर बनता येतं असं मानलं जातं.

अक्षयनं हा समज खोटा ठरवलाय. तो गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यामध्ये उत्तम फोटोग्राफी करतोय. तो कोणताही फोटो अगदी परफेक्ट क्लिक करतो.

अक्षयचं फोटोग्राफी हे पॅशन आहे. तो पुण्यात प्रोफेशनल फोटोग्राफर बनला आहे.

अक्षयला त्या आजोबांनी कॅमेरा घेऊन दिला. तो कॅमेरा स्वत:च शिकला. अनेक सेलिब्रेटींचे फोटो त्यानं काढले आहेत.

या आजारामुळे अक्षय चार वर्ष अंथरुणाला खिळून होता. त्या काळात त्याच्या आईनं आणि बहिणीणं त्याला सर्वाधिक सांभाळलं.

चार वर्ष अंथरूणावर खिळून पडलेला अक्षय आज समाजात आत्मविश्वासानं वावरत आहे.

कितीही मोठं संकट अचानक आलं तरी त्यामधूनही मार्ग काढता येतो. दुर्मीळ आजारातूनही बाहेर पडता येतं हे अक्षयनं दाखवून दिलं आहे.