रमजानच्या उपवासांनाही महागाईचा फटका

 छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात रमजान महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात पेंड खजूर उपलब्ध झाले आहेत. 

 शहरातील प्रत्येक चौकामध्ये पेंड खजूरची विक्री होत असल्याचे बघायला मिळत आहेत. 

 बाजारात पेंड खजूर मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यांच्या किंमती मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत.

यंदा डॉलरचे दर वाढल्याने तसेच टॅक्स लागल्यामुळे याचा परिणाम शहरातील विक्रीसाठी आलेल्या पेंड खजुराच्या किंमतीमध्ये बघायला मिळत आहे.

टेरको, मरियम या पेंड खजुराची गेल्या वर्षी 110 रुपये किंमत होती यंदा यावर्षी ही किंमत 250 ते 280 रुपये प्रमाणे आहे.

इराणी चटई खजूरचे दर गेल्या वर्षी 220 ते 230 पर्यंत होते. मात्र आता या खजूरचे दर 260 ते 270 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. 

यासोबतच प्रत्येक खजूरच्या किंमतीमध्ये याचप्रमाणे भाववाढ बघायला मिळत आहे.