अशा घरात गेलं ज्योती मौर्या यांचं बालपण, पाहा PHOTOS

ज्योती मौर्या या उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. वाराणसी शहरापासून दूर चिरईगाव त्यांचे माहेर आहे.

जिथे त्यांचे बालपण गेले, तिथली EXCLUSIVE फोटो समोर आली आहेत.

महिला अधिकारी ज्योती मौर्या आणि त्यांचे पती आलोक यांच्या वाद वाढतच जात आहे. 

नोकरी लागल्यावर त्यांनी आपले पती आलोक याला सोडत दुसऱ्या अधिकाऱ्यासोबत जवळीक वाढवली, असा आरोप करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर हे प्रकरण फारच चर्चेत असून. याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

आता त्यांच्या लग्नाचे कार्ड समोर आले आहे. यात आलोक हे सफाई कर्मचारी ऐवजी ग्रामपंचायत अधिकारी असे लिहिले आहे.

याप्रकरणी आता ज्योती यांचे माहेर कुठले आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

2010 मध्ये ज्योती यांचे लग्न आलोक मौर्या नावाच्या एका तरुणाशी झाले होते. तेव्हा ज्योती या एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या.

आलोकची सरकारी नोकरी होती, त्यामुळे त्यांचे वडील पारसनाथ यांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. 

दरम्यान, आता ज्योती मौर्या यांच्या परिवारातील कुणीही त्यांच्या या प्रकरणावर काहीही बोलायला तयार नाहीएत.