लालपरीची तुटलेली सीट अन् गंजलेला पत्रा!

गेल्या 60 वर्षांपासून लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. 

वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन! अशी म्हणच गाव खेड्यात प्रचलित असून प्रवाशांचा एसटीवर विश्वास आहे. 

सध्या खासगी प्रवासाची साधने उपलब्ध असूनही सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर विश्वास कायम आहे. 

महिलांसाठी अर्ध तिकीट सारख्या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढच होताना दिसतेय. 

एसटीच्या ताफ्यात नव्या गाड्या दाखल झाल्या तरी ग्रामीण भागातील लालपरीत फार बदल दिसत नाहीत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एसटी बसच्या दुरावस्थेच्या फोटोचे विधिमंडळातही पडसाद उमटले होते. 

बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची दुरावस्था झाली असून प्रवाशांतून संताप व्यक्त होतोय. 

ग्रामीण भागात जाणाऱ्या बस काचा फुटलेल्या, शिट फाटलेल्या, पत्रा गंजलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

प्रवाशांना मोडकळीस आलेल्या बसचा आवाज हैराण करतो, तर मध्येच बस बंद पडण्याची भीती सतावते.

या बसच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे विभागीय नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी सांगतिले. 

खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये!

Click Here