प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ

रिक्षा चालवणे हा व्यवसाय सध्या बऱ्याच जणांकडून केला जातो.

पण या रिक्षा सोबतच आपली विशेष ओळख जपणारे देखील समाजात बघायला मिळतात. 

पंढरपूरचे विष्णू शेटे हे त्यापैकीच एक रिक्षा चालक आहेत. त्यांनी त्यांची रिक्षा खास पद्धतीनं सजवलीय. त्याचबरोबर सामाजिक भानही जपले आहे.

काय आहे वेगळेपण?
विष्णू शेटे यांनी 2004 साली पहिली तर 2014 साली दुसरी रिक्षा विकत घेतली. 

त्यांनी पहिली रिक्षा रॉबिनहून आर्मी या सामाजिक संस्थेला दान केली. तर दुसरी रिक्षा 2022 साली विकून नवीन रिक्षा खरेदी केली होती. 

शेटे ही रिक्षा आतून आणि बाहेरून सजवून वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होतात.

कोल्हापूरमध्ये नुकत्याच झालेल्या सौंदर्य स्पर्धेतही ते सहभागी झाले होते. रिक्षा चालवताना गोरगरिबांसाठी काही तरी करायला पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात येत असे.

समाजिक कार्य करण्याच्या भावनेनं प्रेरित होऊन विष्णू यांनी  समाजातील गरजू घटकांना मदत करायला सुरुवात केली. 

एखाद्या गरिब व्यक्तीला स्वतः जवळचे 10 रुपये जरी द्यायचे म्हटले, तरी त्यांना ते खूप असतात.

इतर प्रवाशांकडून पैसे घेऊन आनंद मिळविण्यापेक्षा गरिबाला मदत करुन मिळवलेला आनंद खूप मोलाचा आहे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती तसंच गर्भवती महिलांना मोफत सेवा देण्याचं कामही विष्णू करतात.

विष्णू शेटे हे सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी अग्रेसर असतात. 

कोरोना परिस्थितीमध्ये रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोचवण्यासाठी देखील रिक्षातून मोफत सेवा विष्णू यांनी दिली होती.