संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूर कडे प्रस्थान झाली आहे.
या पालखी सोहळ्यात राज्यभरातील वारकरी सहभागी आणि दिंड्या सहभागी होतात.
आळंदीतून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत दरवर्षी आयटी दिंडी सहभागी होते.
विठू नामाचा जयघोष करीत अनेक आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे या सोहळ्यात सहभागी होत असतात.
आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 16 वर्षांपासून आयटी दिंडी सहभागी होत आहे.
माऊलींच्या पालखी सोबत ही दिंडी आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड अशी वारी करतात.
यंदा ही दिंडी माऊलींच्या पालखीसोबत थेट पंढरपूरपर्यंत जाणार आहे.
वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या पदावर काम करणारे 2 हजार लोक या दिंडीत सहभागी होणार आहेत.
यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे होत असल्यानं आयटी दिंडीचं घोषवाक्य 'धर्म विठोबा आणि कर्म शिवबा' असं आहे.
दिंडीच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या फंडाचा शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तीसाठी वापर केला जातो.
पठ्ठ्यानं मुंबई पोलीस होऊनच दाखवलं!
Click Here