महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे बऱ्याचदा दूर्लक्ष होत असतं.
महिलांच्या मासिक पाळीसारख्या विषयावर बोलणं टाळलं जातं.
मासिक पाळीत आरोग्याची काळजी न घेणं जीवावर बेतू शकतं.
अहमदनगरमधील अल्फिया शेख यांनी सॅनिटरी पॅड बनवण्याचा निर्णय घेतला.
अल्फिया यांनी मुलीच्या नावाने इनाया हायजिन नावाने व्यवसाय सुरू केला.
अल्फिया यांनी विंगस्टार नावाने सॅनिटरी पॅड बनवण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांच्या या व्यवसायाची अनेकांनी खिल्ली उडवली.
ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी काम सुरूच ठेवले.
वाड्या-वस्त्यावर जाऊन शेतकरी, ऊसतोड मजूर महिलांचे प्रबोधन केले.
अल्फिया यांनी बनवलेल्या पॅडमध्ये प्लास्टिकचा वापर नसून किंमत कमी आहे.