अस्सल कोल्हापुरी चप्पल आता मुंबईत!
कोल्हापूरात बनलेल्या कोल्हापुरी चप्पलला देशभरासह परदेशातही मागणी वाढली आहे.
सुबक आकार, नक्षीकाम, टिकाऊपणा यामुळे कोल्हापुरी चप्पल खुप प्रसिद्ध आहे.
मुंबईच्या दादरमार्केटमध्येही अस्सल कोल्हापुरी चप्पलच दुकान आहे.
या दुकानात पुरुषांचे कोल्हापुरी चप्पलचे वेगवेगळे प्रकार मिळतात.
मुंबईच्या दादरमार्केटमध्ये चंद्रकांत चप्पल मार्ट आहे. येथे मिळणारे चप्पल कोल्हापूर येथे बनतात.
डबल वादी, सिंगल वादी, पॉईंटेड, शाहू, पुणेरी शेप, सेनापती कापसी हे प्रकार येथे मिळतात.
याच बरोबर कुरुंदवाड, मोजडी, कुशन हे कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहेत.
500 ते 1600 रुपयांपर्यंत या दुकानात चप्पल उपलब्ध आहेत.