चित्र शिल्प प्रदर्शनातून रंगसंगतीचा नजराणा

मध्यवर्ती संग्रहालयात आणि योगार्ट गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती संग्रहालय, सिव्हिल लाईन येथे चित्र शिल्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

चित्र शिल्प प्रदर्शनी मध्ये सुमारे 50 पेक्षा अधिक कलाकृती ठेवल्या होत्या.

चित्र प्रदर्शनात कॅनव्हास पेंटिंग व शिल्पांचा समावेश आहे.

नागपूर येथील प्रसिद्ध शिल्पकार योगगुरु गुरू कौशल, सुप्रसिद्ध चित्रकार राजीव निमजे आणि सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार विनायक निट्टूरकर यांनी साकारलेली चित्रे आहेत.

 प्रदर्शनी मध्ये चित्र व शिल्प या विषयावर चर्चासत्र व प्रात्यक्षिकांचे आयोजित करण्यात आले होते.

विविध रंग छटातून साकारलेले हे अप्रतिम चित्र पाहण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती.