लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी 'इथं' होते गर्दी

जालन्यात एका पेक्षा एक भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ खवय्यांना खाण्यासाठी मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मिळणारा लोणी स्पंज डोसा खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या ठिकाणी लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते.

गजानन अकात यांनी 2011 मध्ये श्री कानिफनाथ दावणगिरी या नावाने आपली लोणी स्पंज डोस्याची गाडी सुरु केली.

त्यांनी बनवलेला लोणी स्पंज डोसा खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

डोस्याबरोबर शेंगदाणा चटणी आणि बटाट्याची भाजी देखील खवय्यांना दिली जाते. 

हा डोसा लोणी टाकून तयार केला जातो. यामुळे डोस्याची चव आणखीचं वाढते.

हीच या डोस्याची खासियत आहे, असं गजानन अकात सांगतात.