कॅन्सरग्रस्तांना मोफत जेवण देणारा 'अन्नदाता'

मुंबईतील हॉस्पिटलमध्ये देशभरातील रूग्ण उपचारासाठी येतात.

टाटा कॅन्सर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल मुंबईतील परळ भागात आहेत. 

त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात पेशंट्सची गर्दी असते.

 या पेशंट्ससोबत त्यांचे नातेवाईकही असतात. 

त्यामधील अनेकांना सर्व उपचार पूर्ण होईपर्यंत फुटपाथवरच राहावे लागते.

या नातेवाईकांना मुंबईतील एक संस्था मोफत जेवण देते. 

अन्नदाता सुखी भव माणुसकीची उब या संस्थेचे संस्थापक जय होलमुखे हे त्यांना मोफत जेवण देतात.

2013 सालापासून या संस्थेकडून रोज एक वेळेसचे मोफत अन्नदान दिले जाते.