भारतातील पहिला 'मॉल' गंजगोलाई मार्केट!
                 अलीकडे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही मॉल संस्कृती आली आहे. 
                एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळणाऱ्या बाजारपेठ भारतात पूर्वीपासून आहेत. 
                भारतातील पहिला मॉल निजामशाही काळात लातूरमध्ये उभा राहिला. 
                1917 मध्ये नियोजित पद्धतीने उभारलेल्या मार्केटची रचना गोलाकार आहे. 
                स्थानिक व्यापऱ्यांच्या कल्पनेतून गंजगोलाई मार्केट उभे राहिले. 
                सुभेदार राजा इंद्रकरण यांच्या हस्ते 8 जून 1917 रोजी गंजगोलाईचे उद्घाटन झाले.
               मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि बाजूला बाजारपेठ उभारण्यात आले.
                1945 ला परदेशातून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तू रचनाकाराच्या मदतीन कच्ची गोलाई पक्की झाली. 
                 गंजगोलाई ही बाजारपेठ 16 रस्त्यांनी जोडण्यात आली आहे.
                 सोनार लाईन, कापड लाईन, भुसार लाईन अशा सोळा ठोक व्यापाऱ्यांच्या लाईन आहेत.
                 लातूरला गंजगोलाई बाजारपेठ उभी राहिल्यानंतर तसाच प्रयत्न देशात इतरत्रही झाला. 
                 दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले. 
                गंजगोलाई मार्केट हा शहर रचना आणि वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना मानला जातो.