कशी आहे AC डबलडेकर बस?

गेल्या कित्येक दशकांपासून मुंबईकरांना अविरत सेवा देणाऱ्या 'बेस्ट' नं आणखी एक सेवा सुरू केली आहे.

मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस आजपासून (21 फेब्रुवारी) धावणार आहे.

डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे.

बेस्टच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वीच ही अधिक आरामदायी आणि आधुनिक बस दाखल झाली आहे.

ही बस सोमवार ते शुक्रवार बसमार्ग क्रमांक ए-115 वर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए दरम्यान धावणार आहे.

या बसमधून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत.

 शनिवार-रविवार सकाळी 9 वाजल्यापासून संपूर्ण दिवस हेरिटेज टूरसाठी चालवण्यात येईल.

मार्च अखेरीस 50 डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत.