पंक्चरवाल्याची मुलगी होणार डॉक्टर!
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या NEET UG 2023 या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीवर मात करत मोठया जिद्दीनं यश मिळवलंय.
जालना शहरातल्या पंक्चरवाल्याच्या मुलीनंही या परीक्षेत मिळवलेलं यश हे सध्या संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय बनलंय.
मिसबाह खान असं या यशस्वी विद्यार्थीनीचं नाव आहे.
मिसबाहच्या वडिल अन्वर खान यांचा गाडीचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे.
बारावीच्या परीक्षेत 86 टक्के मार्क्स मिळवणाऱ्या मिसबाहनं नीट परीक्षेत 720 पैकी 633 मार्क्स मिळवत घवघवीत यश मिळवलंय.
मिसबाहनं दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क्स मिळवले. त्याचवेळी तिनं कलेक्टर किंवा डॉक्टर होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
गेली दोन वर्ष मेडिकल प्रवेशसाठी आवश्यक असा अभ्यास करत तिनं हे यश मिळवलंय.