इथं मिळतं आईचं दूध!

नवजात बालकांना आपल्या आईचे स्तनपान हेच प्रथम अन्न असतं.

स्तनपानामुळे भविष्यात बाळाला विविध आजारांपासून संरक्षण मिळत असतं. 

बऱ्याच मातांना प्रसूतीनंतर दूध कमी येतं किंवा काहींना येतंच नाही.

अशा परिस्थितीत बाळांना आईच्या दुधाची उणीव भासू नये म्हणून अनोखी योजना सुरू केलीय. 

नागपुरातील डागा शासकीय रुग्णालयात मातृत्व दुग्धपेढी निर्माण करण्यात आलीय. 

रुग्णालयात प्रसूत महिलांचे समुपदेशन करून दूध दान करण्याचे आवाहन केले जाते. 

संबंधित बाळंतणीच्या परवानगीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दूध घेतले जाते.

तपासणी करून संसर्ग विरहित दूध गरजू बाळांना दिलं जातं. 

6 महिने आईचं दूध साठवून ठेवता येतं, असं रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. पारवेकर यांनी सांगितलं. 

बाळाला सुंदर निरोगी व बलवान करण्यासाठी आईचं दूध संजीवनी ठरतं. 

उन्हाळ्यात जवळ बाळगावा कांदा!

Click Here