सध्या महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाची सर्वत्र चर्चा असून सर्व नेते आपआपली ताकद आजमावत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घनदाट जंगल म्हणून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला ओळखलं जातं.
ताडोबा जंगलाची राजधानी म्हणजे ताडोबा तलाव आणि पांढरपौनी तलाव आहेत.
या तलावावर ज्यांचा अधिकार तोच ताडोबाचा राजा होतो आणि राजा म्हटलं की राणी आलीच.
ताडोबाची राणी माया वाघीण असून बऱ्याच वर्षांपासून तिचा ताडोबा आणि पांढरपौनी तलावावर अधिकार आहे.
माया आणि दोन्ही तलावांना मिळवण्यासाठी वाघांमध्ये संघर्ष होतो. विजेता जंगलाचा राजा होतो.
ताडोबात मटकासूर, बजरंग, ताला, रूद्र, बलराम, मोगली हे आपला अधिकार गाजवण्यासाठी फाईट करतात.
सत्तासंघर्षात जो जिंकतो तो राजा बनतो. आता या जंगलाचा राजा मोगली आहे.
मोगलीने आधीचा राजा बलरामला हरवून या भागावर अधिसत्ता गाजवलीय. पण ही सत्ता कायमची नाही.
मायाला मिळवण्यासाठी ताकदवान टायगर येत राहणार आणि सत्तासंघर्ष होत राहणार आहे.
वाघांच्या राज्यात सत्ता टिकवायची असेल तर प्रत्येक वेळी जिंकावे लागेल. (फोटो साभार : डॉ. नितीन बस्ते)
पाकिस्तानातील देवी सोलापुरात!
Click Here