नागपूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये सावजीच्या नॉन व्हेज पदार्थांना मोठं महत्त्व आहे.
अनेक पर्यटकही नागपूरला गेल्यावर या पदार्थांवर ताव मारतात.
नागपूरच्या या सावजीचं वेड एका भल्या मोठ्या कासवाला देखील लागलंय.
हा कासव फक्त आणि फक्त चिकनच खात असल्यानं त्याची नागपूरमध्ये चांगलीच चर्चा आहे.
नागपूरमधील नाईक तलावाच्या दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाचं काम सध्या सुरू आहे.
तलावातील गाळ काढण्याचे काम करताना एक भला मोठा कासव आढळला.
ट्रान्झिट टीमच्या कर्मचाऱ्यांनी या कासवाला सुखरूपणे तलावाच्या बाहेर काढलं.
या कासवाची लांबी 3 ते 4 फूट असून त्याचं वय 100 वर्षांच्या आसपास असावं असा अंदाज आहे.
कासवाला झिंगे, लहान मासे दिले पण ते फक्त चिकन खाते, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रामटेकेंनी दिली.
कासवाचं सध्याचं विशाल रूप आणि चिकन प्रेम सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं आहे.
Click Here